साधारण 2019 मध्ये आलेल्या आदई या तमिळ चित्रपटात देखील ही कथा सांगितली आहे. या घटनेनंतर त्या जागेचं नावही मुलच्छीपुरम किंवा मुलाचीपुरंबु अर्थात 'स्तनाचे स्थान' ठेवले गेले. आज येथे राहणारे लोक मात्र ह्या जागेचं नाव मनोरमा जंक्शन असं सांगतात.
दुसऱ्या एका फोटोमध्ये ब्राह्मण कुटुंबातील स्त्रिया कमरेच्या वरच्या भाग कपड्यांशिवाय दिसत आहे.
इतिहासकार मून एस पिल्लई यांनी कोचीनच्या राणीचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. ज्यामध्ये त्यांचं स्तन झाकलेलं नव्हतं.
असं म्हटलं जातं की, 18-19 व्या शतकात छाती उघडी ठेवणे हा समाजातील उच्चभ्रूंचा आदर करण्याचा एक मार्ग होता. तत्कालीन केरळमध्ये याकडे तुच्छतेने पाहिलं गेलं.
नाडर आणि एडवा समाजातील महिलांनी या परंपरेला विरोध सुरु केला. अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. त्यानंतर त्रावणकोरच्या राजाने स्त्रियांना ब्लाऊज घालण्याची परवानगी दिली.
नांगेली या एझवा जातीतील गरीब महिलेचे जीवन अडचणींनी भरलेले होते. वारंवार कराच्या मागीला कंटाळून नांगेलीने घरात जाऊन तिचे दोन्ही स्तन केळीच्या पानावर स्तन कापून अधिकाऱ्यासमोर ठेवलं.
साधारण 1822 मध्ये स्तन झाकण्यासाठी गरीब महिलांनी बंड केला. त्यानंतर या कराविरोधात 1827, 1858 मध्ये तीन बंडखोरी करण्यात आली. या क्रांतीची नायिका होती नांगेली नावाची एक साधी स्त्री.
केरळमध्ये 17 व्या शतकात एका इटालियन व्यापाऱ्याने शाही सभेत कंबरेच्या वरच्या कपड्यांशिवाय शाही महिला पाहिल्या. त्यानंतर एकच चर्चा झाली. उच्चवर्गीय स्त्रिया खांद्यावर शाल घालत होत्या.
लोककथेनुसार स्तनाचा आकार, त्यातील आकर्षकता यावरुन त्याच्या कराची रक्कम ठरली जायची.
जेव्हा त्यांना स्तन झाकायचं असेल तर त्यांना 'स्तन कर'(Breast tax) द्यावं लागतं होतं. मल्याळममध्ये या कराला मुलक्करम असं म्हटलं जात होतं. राजाने नेमलेला कर वसूल करणारा दलितांच्या घरी जाऊन हा कर वसूल करायचा.
एवढंच नाही तर त्रावणकोर राज्यात म्हणजे आजच्या केरळमध्ये खालच्या जातीतील आणि अस्पृश्य महिलांना कंबरेचा वरचा भाग झाकता येतं नव्हता.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण तो मिशा ठेवण्यावर कर, माशांचे जाळे ठेवण्यावर कर, दागिने घालण्यावर कर, नोकर किंवा गुलाम ठेवण्यावरही कर घ्यायचा
केरळमध्ये सरंजामशाहीचा काळ हा अत्यंत क्रूर आणि भीषण होता. त्रावणकोरचा राजा अत्यंत कठोरपणे आणि क्रूरपणे खालच्या जातीतील लोकांवर कर लादत होता.