अडवाणी यांच्याआधी 'हे' दिग्गज ठरले होते भारतरत्न

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. शिक्षण आणि राजकारण क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे 1954 मध्ये त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने गौरविले.

राजगोपालाचारी चक्रवर्ती

जागतिक शांततेकरीता आणि देशाच्या स्वातंत्र्याकरीता केलेल्या योगदानाबद्दल नेहरुंनी राजगोपालाचारी यांना 1954 मध्ये 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित केले.

सी व्ही रमण

भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक प्राप्त केल्यानंतर सी व्ही रमण यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.

डॉ. राजेंद्र प्रसाद

भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी मिठाचा सत्याग्रह व भारत छोडो आंदोलनादरम्यान दिलेल्या योगदानाबद्दल 1962 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारताचे संविधान आणि मानवी हक्कांसाठी उभारलेल्या लढ्यासाठी त्यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

भारतीय अंतराळ संस्थेला जागतिक पातळीवर मोलाचे स्थान मिळवून दिल्याबद्दल 1998 मध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

प्रणव मुखर्जी

भारतीय राजकारणात अविरतपणे केलेल्या समाजकार्याबद्दल प्रणव मुखर्जी 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

इंदिरा गांधी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. बांग्लादेश मुक्ती युद्धात भारत विजयी होण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

लता मंगेशकर

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भारतीय संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल 2001 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

पंडित भीमसेन जोशी

भारतीय शास्त्रीय संगीतातील अजरामर कारकिर्दीकरीता 2008 मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 2011 मध्ये त्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

लालकृष्ण अडवाणी

भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर झाला आहे. देशातील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना प्रदान करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story