Personal Loan

Personal Loan घेण्याच्या विचारात आहात? या बँका देतायत फायदेशीर ऑफर

बँकांची यादी...

भारतामध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणांमुळं मागदील काही काळापासून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्यामुळं अनेक बँकांनीही कर्जावरील व्याज वाढवल्याचं पाहायला मिळालं.

गणित कर्जाचं...

काही बँका मात्र आजही किमान व्याजदर आकारत आहेत. पाहूया अशा बँकांची यादी...

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ग्राहकांना 10 ते 12.80 दरानं पर्सनल लोन दिलं जात आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांना कर्जाच्या संपूर्ण रकमेच्या 1 टक्का जीएसटी प्रोसेसिंग फी च्या रुपात द्यावा लागेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पर्सनल लोनवर 11 टक्क्यांपासून 15 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाची ऑफर दिली जातेय. यामध्ये तुम्हाला लोनच्या रकमेतून 1.50 टक्के किंवा 1 हजार रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंतची किमान प्रोसेसिंग फी द्यावी लागेल.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया सध्या ग्राहकांना 10.25 टक्क्यांपासन 14.75 टक्क्यांपर्यंतच्या व्याजदरानं पर्सनल लोन देत आहे. शिवाय इथं ग्राहकांना प्रोसेसिंग फी च्या रुपात 2 टक्के किंवा 1000 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंत कमीत कमी दर भरावा लागेल.

एचडीएफसी

एचडीएफसीकडून ग्राहकांना पर्सनल लोनवर 10.50 ते 24 टक्क्यांपर्यंत व्याज आकारला जात आहे. यामध्ये प्रोसेसिंग फी च्या रुपात 4,999 इतकी रक्कम भरावी लागते.

कॅनरा बँक

कॅनरा बँकेकडून पर्सनल लोनवर 10.65 ते 16.25 टक्के व्याजाची ऑफर दिली जात आहे. इथं तुम्हाला प्रोसेसिंग फी म्हणून एकही रुपया भरावा लागत नाही.

VIEW ALL

Read Next Story