उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आलंय.
येत्या 22 तारखेला राम मंदिरातल्या गर्भगृहात राममल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे.
यानंतर 23 तारखेपासून सर्व रामभक्तांसाठी मंदिराचे दरवाजे खुले होतील.
अयोध्येत उभारण्यात आलेलं हे राम मंदिर भव्य आणि नजरेचं पारणं फेडणारं आहे
या राम मंदिराची रचना तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे चंद्रकांत सोमपुरा
चंद्रकात सोमपुरा यांच्या पंधार पिढ्या मंदिराची कलाकृती बनवण्याचं काम करत आल्यात
सोमपुरा कुटुंबाने देशातील अनेक मोठ्या मंदिरांची कलाकृती बनवल्या आहेत.
यात गुजरातचं सोमनाथ मंदिर आणि बिरला मंदिराचाही समावेश आहे.