392 खांबांवर उभं असणारं हे तीन मजली मंदिर राजस्थानच्या पिंक सॅन्डस्टोन पासून बनवण्यात येत आहे.
मंदिराच्या चारही बाजूनं एकूण 44 दरवाजे असतील. जे वेगवेगळ्या दिशला बनवण्यात येतील.
हे मंदिर बनवण्यासाठी तब्बल 18,000 कोटी खर्च करण्यात येत आहे.
या मंदिराचे आर्किटेक्ट (वास्तुविशारद) हे चंद्रकांत सोमपुरा आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा निखिल सोमपुरा आणि आशीष सोमपुरा आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरयू नदीच्या तटावर हे मंदिर बांधण्यात येत आहे. असे म्हटले जाते की इथेच श्रीराम यांचा जन्म झाला होता.
एकावेळी 25 हजार भक्त येथे येऊ शकतात. त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध असतील.
या मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी लॉकर आणि तपासणी केंद्र देखील असणार आहे. (All Photo Credit : Social Media)