एमबीए पूर्ण केल्यानंतर शिल्पकलेमध्ये करिअर करणारा अरुण योगीराज सध्या भारतभरात चर्चेत आहे.
अरुणने साकारलेली रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.
शिल्पकलेमध्ये करिअर करण्याचा अरुणचा विचार नव्हता.
अरुणच्या कुटुंबातील 5 पिढ्या शिल्पकलेमध्येच आहेत.
एमबीएनंतर कॉर्परेट जॉब न करता अरुणने वडिलोपार्जित व्यवसाय असलेल्या शिल्पकलेमध्येच करिअर सुरु केलं.
अरुणने यापूर्वीही अनेक सुंदर पुतळे साकारलेत.
इंडिया गेटजवळ उभारलेला 30 फुटांचा सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अरुणने साकारलेल्या पुतळ्यांपैकीच एक.
खुद्द पंतप्रधान मोदींनाही अरुणने साकारलेला हा सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा फार भावला.
केदारनाथमधील 12 फुटांचा आदी शंकराचार्याचे शिल्प अरुणनेच साकारले आहे.
मैसूरमधील 21 फुटी उंचीचे हनुमानाच्या शिल्पाबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचेही अनेक पुतळे अरुणने साकारलेत.
अरुणच्या हातून प्रभू रामलल्लांची मूर्ती घडावी हे त्याच्या आईचं आणि पत्नीचं एखादं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे.
अरुणचा देवावर फार विश्वास आहे. त्यामुळेच मूर्तीची घडवताना तो केवळ पूर्ण विश्वासाने काम करतो आणि त्याच्या हातून कलाकृती घडत जाते, असं तो सांगतो.
प्रभू रामलल्लांची मूर्ती साकारणे हे काही सोपे काम नव्हते. मूर्तीवरील हावभावांबरोबरच मूर्ती पाहता क्षणी मनातील भक्तीभाव जागा झाला पाहिजे इतकी ती रेखीव हवी होती आणि अरुणने तशीच मूर्ती साकारली.
अरुणचा प्रवास हा खरोखरच प्रेरणादायी आहे.
आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड असेल आणि आपण ती चिकाटीने करत असू तर त्यात आपल्याला यश मिळतं हे अरुणचा प्रवास पाहिल्यानंतर समजतं.