Amarnath Yatra

Amarnath Yatra 2023 : रहस्य आणि श्रद्धेचा मेळ; वाचा अमरनाथाची 'अमर कथा'

अनेकांचाच मानस

अशी ही यात्रा करण्याचा अनेकांचाच मानस असतो. काही नशिबवंतांना या योग येतो आणि त्यांच्यामुळं जणू इतरांपर्यंत अमरनाथाची ख्याती पसरते. अमरनाथ आणि शिवलिंगाचं स्थान असणारी पवित्र गुफा यांबाबतच अनेक कथाकहाण्या आजवर सांगण्यात आल्या आहेत. किंबुना एक 'अमर कथा'ही आहे.

तप का करावं लागतं?

ही कथा अशी की, एके दिवशी पार्वतीनं महादेवाला त्यांच्या अमरत्वाबाबतचा प्रश्न केला. यावेळी मलाच कायम तुमची साथ मिळवण्यासाठी कठोर तप का करावं लागतं? असा प्रश्नही केला. पार्वतीचा हट्ट पाहून अखेर महादेवानं हे रहस्य एकांतात सांगण्याचा निर्णय़ घेतला.

पंचतत्वांचा त्याग

निरव शांतता आणि एकांतासाठी त्यांनी अमरनाथ गुहा निवडली. तिथं येण्यासाठी महादेवानं पंचतत्वांचा त्याग केला. गुहेच्या चारही बाजुंना अग्नि प्रज्वलित केला आणि रहस्यपर कथा सांगण्यास सुरुवात केली.

पार्वतीचा डोळा लागला

कथा सुरु असतानाच माता पार्वतीचा डोळा लागला. आश्चर्य म्हणजे महादेवाच्याही ही बाब लक्षात आली नाही. तिथं असणारं एक कबुतराचं जोडपं ही कथा ऐकून हुंकार देत होतं.

कथा नेमकी ऐकली तरी कोणी?

जेव्हा लक्षात आलं तेव्हा कथा नेमकी ऐकली तरी कोणी? हा प्रश्न शंकराच्या मनात घर करून गेला ज्यानंतर नजर फिरवताच त्यांना तिथं कबुतरं दिसली.

क्षमायाचना

भगवान शंकराचा संताप अनावर झाला हे पाहून त्या कबुतरांनी महादेवाकडे क्षमायाचना सुरु केली.

शंकराचा क्रोध

ही कबुतरं शंकराला उद्देशून म्हणाले, आम्ही ही कथा ऐकली आहे त्यामुळं आता तुम्ही आम्हाला मारल्यास ही कथाच असत्य होईल. त्यामुळं तुम्हीच आमचं मार्गदर्शन करा अशी याचना त्यांनी केली.

कबुतर

कबुतरांची याचना ऐकल्यानंतर तुम्ही शंकरानं त्यांना वरदान दिलं की आजपासून तुम्ही इथं शिव आणि शक्तीचं प्रतीक म्हणून कायम वास करत राहाल.

अमरनाथ

त्या क्षणापासून कबुतरांचं जोडपं अमर झालं आणि ती गुहासुद्धा अमर झाली. जगभरात ही गुहा अमरनाथ गुहा म्हणून ओळखली जाऊ लागली जिथं साक्षात शंकराता वावर आहे.

VIEW ALL

Read Next Story