इस्त्रोने 14 जुलैला चांद्रयान-3 चं प्रक्षेपण केलं. आता इस्त्रोसह संपूर्ण देशाला चांद्रयान-3 चंद्रावर लँड होण्याची प्रतिक्षा आहे. पण यासाठी चांद्रयान-3 ला अनेक दिवसांचा प्रवास करावा लागणार आहे.
चांद्रयान-3 चंद्रावर लँड होण्यासाठी अजून वेळ आहे. पण जेव्हा चांद्रयान-3 चंद्रावर उतरेल तेव्हा कसं दिसेल, याचे काही फोटो AI ने तयार केले आहेत.
फोटो तयार करणारे बॉट्स सध्या चर्चेत आहेत. या बॉट्समधील Midjourney ला सर्वाधिक पसंती आहे, जे कोणतेही फोटो तयार करता.
AI ने तयार केलेले हे फोटो काल्पनिक आहेत. त्यामुळे चांद्रयान-3 लँडिगवेळी असंच दिसेल किंवा असंच लँडिग होईल असं नाही.
पण हे फोटो मात्र कमाल असून व्हायरल होत आहेत.
चांद्रयान-3 चं लँडिंग ऑगस्ट महिन्यात होणार आहे. 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान कोणत्याही वेळी चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर चांद्रयान लँड करेल.
5 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.
लँडिग सुरक्षित व्हावं यासाठी विक्रम लँडरच्या चारही पायांची क्षमता वाढवण्यात आली आहे. नवे सेन्सॉर आणि नवं सोलार पॅनल जोडण्यात आलं आहे.
चांद्रयान-3 च्या इंजिनची क्षमता आधीच्या तुलनेत वाढवण्यात आली आहे.