मेरा देश बदल राहा है!

मेरा देश बदल राहा है! स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्षांनी उत्तराखंडमधील 8 गावांमध्ये पहिल्यांदाच...

निसर्गानं मुक्तहस्ताने केलेली उधळण

मुळात सर्वांर्थानं निसर्गानं मुक्तहस्ताने केलेली उधळण असणारं हे राज्यच इतकं सुंदर की इथं आलं की भान हरपणं काही नवं नाही. अशा या राज्यातील काही गावं आता सहजपणे तुम्ही गाठू शकणार आहात.

पक्का रस्ता

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 75 वर्षांनंतर उत्तराखंडच्या पिथोरागढ येथील आठ गावांमध्ये पक्का रस्ता पोहोचणार आहे.

कठीण परिस्थितीचा सामना

चीनच्या सीमेनजीक असणाऱ्या या गावांमध्ये रस्त्येमार्गानं पोहोचण्याची सुविधा नसल्यामुळं तेथील नागरिकांना बऱ्याच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता.

10.1 किमीचा रस्ता

राज्याच्या ग्रामीण विकास विभागाच्या माहितीनुसार तिडांग, सीपू आणि मार्चा गावांमध्ये 10.1 किमीचा रस्ता बांधला जाणार आहे.

रोनगाव

रोनगावमध्ये 1.025 किमी आणि पंचू गुंथमध्ये 6.40 किमीचा रस्ता बांधला जाणार आहे. तर, तोलामध्ये 3.325 किमी आणि खिमलिंगमध्ये 23.20 किमीचा रस्ता बांधला जाणार आहे.

border tourism

राज्यातील सीमाभागात असणाऱ्या गावांमध्ये रस्त्यांचं काम हाती घेण्यासोबतच border tourism ला प्रोत्साहन देण्याचाही मानस राज्यशासन बाळगत असल्याचं कळत आहे. थोडक्यात उत्तराखंडमध्ये आता तुम्ही साचेबद्ध ठिकाणांना भेट देण्यापेक्षा काही नव्या ठिकाणांवर अगदी सहजपणे पोहोचू शकणार आहात हे नक्की.

VIEW ALL

Read Next Story