Google Map ने सांगितलेल्या रस्त्याने गेले अन् गमवला जीव

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यामधील तीन तरुण बाईकवरुन हजारीबागवरुन धनबादला जात होते.

गुगल मॅपची मदत घेतली, पण...

मात्र नेमका रस्ता ठाऊक नसल्याने या तरुणांनी गुगल मॅपची मदत घेतली. पण हाच निर्णय त्यांच्या जीवाशी बेतला.

गुगलने मॅपने दाखवलेल्या रस्त्यावरुन जाताना...

गुगलने जो रस्ता दाखला त्यावरुन जाताना नदीच्या पाण्यात हे तिघे प्रवास करत असलेली बाईक वाहून गेली.

एकाने वाचवला स्वत:चा जीव

या तिघांपैकी एकाने नदीतून पोहत बाहेर येत आपला जीव वाचवला.

एकाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता

मात्र अन्य दोघेजण बेपत्ता झाले आहेत. यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.

कुठे घडली घटना?

ही घटना गिरिडीह येथील बरगंडा-सिरिया मार्गावरील नदीच्या पुलाजवळ घडली.

माहिती मिळताच पोलिस दाखल

या घटनेची माहिती मिळताच मुफस्सिल पोलिस स्टेशनचे प्रमुख आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

तरुणांचा शोध सुरु

बचाव पथकाच्या मदतीने नदीमध्ये या बेपत्ता तरुणांचा पोलिस शोध घेत आहेत.

पाणबुड्यांना पाचारण करण्यात आलं

बेपत्ता तरुणांचा खंडोली धरणाजवळ पाण्यात शोध घेण्यासाठी पाणबुड्यांना पाचारण करण्यात आलं आहे.

आम्ही नदीत पडलो

बाईक रस्त्यावरुन घसल्याने तोल जाऊन आम्ही नदीत पडल्याचं वाचलेल्या तरुणाने सांगितलं. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

VIEW ALL

Read Next Story