महिलांच्या चिडचिडेपणाला हार्मोनल बदल कारणीभूत? कसे ओळखायचे?

Women Hormonal Imbalance: स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन सामान्यत: मासिक पाळी, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात दिसून येते. पण आजच्या बिघडलेल्या जीवनशैलीत ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.

हार्मोनल संतुलन राखण्यासाठी दैनंदिन दिनचर्या आणि आहारात काही बदल करणे आवश्यक असते. याबद्दल जाणून घेऊया.

हार्मोन्स हे एक प्रकारचे रसायन असून ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचून संदेशवाहक म्हणून काम करते.

हार्मोन्सचे प्रमाण वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. ज्याचा परिणाम शरीरावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो.

हार्मोन्स असंतुलित असलेल्या स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळी, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, पाठीच्या खालच्या भागात दुखू लागते.

तसेच त्वचेच्या समस्या, केस गळणे, अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे, बद्धकोष्ठता समस्या, झोप न लागणे अशी लक्षणे दिसतात.

खाण्याच्या चुकीच्या सवयी हे देखील हार्मोनल असंतुलनाचे एक प्रमुख कारण आहे. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, रिफाइंड पिठापासून बनवलेल्या गोष्टी, रिफाइंड तेलाचा जास्त वापर करु नये.

प्रक्रिया केलेले पदार्थ, मद्यपान आणि धूम्रपानाचा नकारात्मक परिणाम होतो. तसेच दैनंदिन दिनचर्येमुळेही ही समस्या उद्भवू शकते.

जास्त ताण घेतल्यास शरीरात कोर्टिसोल हार्मोन अधिक प्रमाणात तयार होते. ज्यामुळे निद्रानाश आणि थकवा उद्भवतो.

सतत स्टेरॉईड्स किंवा इतर औषधे घेत असाल तेव्हा हार्मोन्सची पातळीही असंतुलित होऊ शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

VIEW ALL

Read Next Story