हिवाळ्यामध्ये 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

Nov 20,2023

दूध

दूध हे थंड असतं, त्यामुळे हिवाळ्यात दुधाच्या सेवनाने कफ होण्याची समस्या होते. त्याशिवाय जास्त प्रमाणात दूध प्यायल्यामुळे तुम्हाला घशाचा त्रास होऊ शकतो.

चहा किंवा कॉफी

हिवाळ्यात गारे गार थंडीत लोक चहा आणि कॉफीचं अधिक आस्वाद घेतात. मात्र त्यामध्ये फॅट आणि कॅफिन जास्त असल्याने त्यामुळे झपाट्याने वजन वाढतं. त्याशिवाय डी-हायड्रेटची समस्या सोबत अॅसिडिटीची समस्या उद्घभवू शकते.

ऑफ सीजन फळं

हंगामानुसार फळं खाल्ल्यास शरीराला फायदा होत असतो. पण चुकीच्या हंगामात चुकीचं फळाचं सेवन केल्यास शरीरासाठी हानिकारक ठरतं.

गोड पदार्थ

तज्ज्ञ सांगतात की, जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाण्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्याशिवाय गोड खाण्याने शरीरातील बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असल्याने अनेक आजारांना निमंत्रण ठरु शकतं.


हिवाळ्यात हृदयाचा त्रास असलेल्या लोकांनी चुकूनही रेड मीट खाऊ नये. रेड मीटच्या सेवनाने सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्याशिवाय रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची भीती असते.


हिवाळ्यात फास्ट फूड चुकूनही खाऊ नका. त्यातील तेल आणि मसाल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. त्याशिवाय डायबिटीजचाही त्रास उद्भभवू शकतो.

तेलकट पदार्थ

हिवाळ्यात तेलकट पदार्थ जसे की समोसा, पकोडे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्ऱॉल वाढवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे हे पदार्थ हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story