जाणून घ्या ब्रामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्याचे धोके काय...
शरीराला सुडौल ठेवण्यासाठी योग्य आकाराची ब्रा वापरणं महत्त्वाचं असतं.
ब्रामुळे केवळ स्तन सुडौल राहतात असं नाही तर यामुळे पर्सनॅलिटी सुधारण्यासही मदत होते.
मात्र रात्री झोपतानाही ब्रा घालून झोपणं योग्य आहे का?
तज्ज्ञांना यासंदर्भात विचारलं असता त्यांनी थोडी सैल ब्रा घालून झोपल्यास काहीही अडचण नसते.
मात्र घट्ट ब्रा वापरणाऱ्या महिलांनी ब्रा काढूनच झोपलेलं आरोग्यासाठी फायद्याचं असतं, असं तज्ज्ञ सांगतात.
रात्री घट्ट ब्रा घालून झोपल्याने अनेक आरोग्यविषयक समस्या आणि अडचणी निर्माण होतात. त्या कोणत्या पाहूयात..
घट्ट ब्रा घालून झोपल्यास स्तनांजवळच्या त्वचेला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.
घट्ट ब्रामुळे छातीला खाज येण्याची समस्याही निर्माण होऊ शकते. ही खाज येण्याची समस्या केवळ रात्रीपुरती नाही तर दिवसाही त्रादायक ठरु शकते.
घट्ट ब्रा घालून झोपल्याने रक्ताभिसरणावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक व्याधींचा त्रास भविष्यात होण्याचा धोका वाढतो.
घट्ट ब्रा घालून झोपण्याचा आणि स्तनांच्या कॅन्सरचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे.
Disclaimer - वरील माहिती सर्वसामान्य माहिती आणि संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.