हे मशीन स्कॅनरचे काम करते. आणि गरजे नुसार शरीरातील आंतरिक भागांचे फोटो काढते.
खरे तर एमआरआय मशीन कधीच बंद न करण्याचं कारण त्याचे चुंबक आहे, ज्यावर ते काम करते. या चुंबकीय क्षेत्राव्दारे शरीरात असलेल्या हायड्रोजनचा वापर करून फोटो काढले जातात.
हे चुंबक सुपरकंडक्टिंग कॉईल ने बनलेले असते. ज्याला हेलियम लिक्विडच्या सहाय्याने थंड ठेवावे लागते. त्यामुळे सुपरकंडक्टिंग कॉईल आणि हेलियम चांगल्या अवस्थेत असणे गरजेचे असते.
जर या मशीनला बंद केले तर त्याची सुपरकंडक्टिविटी संपेल आणि गरम होईल. या शिवाय हेलियम सुध्दा गरम होऊन मशीन खराब होईल.
सुपरकंडक्टिविटी कायम राहण्यासाठी आणि हेलियम गरम होऊ नये यासाठी मशीनला नेहमी सुरू ठेवले जाते. कारण सतत मशीन चालू बंद केल्यास चुंबकीय क्षेत्र तयार होण्यास वेळ लागतो आणि ते जास्त खर्चिक असते.