रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. रक्तदान करुन तुम्ही एका व्यक्तीचा जीव वाचवू शकता. पण काही व्यक्तींना रक्तदान करण्यास मज्जाव केला जातो.
सुदृढ पुरूष दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो आणि स्त्री चार महिन्यांनी रक्तदान करु शकते. पण रक्तदान कोण करु शकत नाही हे एकदा जाणून घ्या
रक्तदाता गेल्या २८ दिवसांमध्ये कोणत्याही देशातून आलेला नसावा किंवा त्यांच्या कुटुंबीयातील, सहकाऱ्यांमधील परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात आलेला नसावा.
रक्तदात्यास मागील २८ दिवसांमध्ये खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे नसावीत. रक्तदाता हा सुदृढ व निरोगी असावा.
मधुमेहींना इन्सुलिन असेल, तर त्यांना रक्तदान करता येणार नाही.
हृदयविकार, कॅन्सर, इपिलेप्सी, सोरायसिस यांसारख्या त्वचांचे आजार असलेल्या व्यक्तींना रक्तदान करता येणार नाही
महिला गर्भवती असल्यास व मूल अंगावर स्तनपान करीत असल्यास; तसेच मासिक पाळी सुरू असल्यास रक्तदान करू नये.
रक्तदानापूर्वी व नंतर कमीत कमी सहा तास तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू यांचे सेवन करू नये. रक्तदान करण्यापूर्वी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे द्यावीत