Mpox पासून सावधान; WHO नं सांगितला या संसर्गापासून बचावाचा मार्ग

Aug 09,2024

एमपॉक्स

एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्स एक गंभीर आजार असून, मागील काही दिवसांपासून हा आजार आफ्रिकन देशांमध्ये अधिक फोफावताना दिसत आहे.

आजार

एमपॉक्स हा एक दुर्धर आजार असून, तो Samllpox सारखाच असतो असं तज्ज्ञांचं मत. सध्या या आजाराच्या संसर्गासंदर्भात आफ्रिकेतील देशांना सावध करण्यात आलं आहे.

रुग्ण

रिपब्लिक ऑफ काँगो येथे या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला होता. ज्यानंतर हा संसर्ग युगांडा, केनियापर्यंत पसरला.

WHO

या संसर्गाची व्याप्ती पाहता WHO येत्या काळात जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करू शकते.

लक्षणं

एमपॉक्सची लक्षणं शरीरात विकसित होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. या लक्षणांमध्ये शरीरावर चट्टे, ताप, थकवा, डोकेदुखी, थंडी, मांसपेशींमध्ये वेदनांचा समावेश आहे. लाल दाणेदार चट्टे या संसर्गाचं मुख्य लक्षण आहे.

संक्रमित

एका व्यक्तीपासून हा संसर्ग अनेक पद्धतींनी दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. हा विषाणू संक्रमित त्वचा किंवा शरीराच्या इतर भागांतून निघणाऱ्या द्रव्यांवाटे इतरांना संक्रमित करू शकतो.

स्वच्छता

एमपॉक्सची लक्षणं आणि त्यांचा वाढता धोका पाहता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत स्वच्छतेसंदर्भातही निकषांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story