शिमला मिरची भाजी अनेकांना आवडते. चायनिज पदार्थांमध्ये शिमला मिरची वापरली जाते. यात अनेक पोषक घटक आढळतात.
भाजी मार्केटमध्ये हिरवी, लाल आणि पिवळ्या रंगाची शिमला मिरची मिळते. पोषण तज्ज्ञ दीपशिखा जैन म्हणतात की, तिन्ही प्रकारच्या शिमला मिरची चांगल्या असतात.
पण लाल शिमला मिरची आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम आणि फोलेट सारखे अनेक पोषक घटक आढळतात.
लाल शिमला मिरची आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते.
प्रतिकारशक्ती वाढविण्यास मत मिळते.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी लाल शिमला मिरची फायदेशीर आहे.
वजन कमी करायच असेल तर लाल शिमला मिरचीच सेवन करावं.
अशक्तपणा आणि थकवा नाहीसा करण्यासाठी लाल शिमला मिरची फायदेशीर आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)