उष्णता असताना शरीरातून घाम येणे ही सामान्य गोष्ट आहे. गरमी वाढत असताना संपूर्ण शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात.
हात, पाय, मान, इतकंच काय तर तळव्यांनाही घाम सुटतो. पण तुम्हाला हे माहितीये शरीराच्या एका अवयवाला कधी घाम सुटत नाही
आपल्या शरीरातील ओठ हा असा अवयव आहे. ज्याला कधीच घाम येत नाही. पण कसं का होतं जाणून घ्या.
ओठांना कधीच घाम येत नाही कारण ओठांमध्ये घामग्रंथीच नसतात.
ज्या तत्वांमधून घामाची निर्मिती होते त्याला एक्सोक्राइन ग्लँड म्हणून ओळखले जाते.
सामान्यपणे त्वचेवर 12 स्तर असतात मात्र ओठांवर केवळ 5 स्तर असल्याने ओठांचा रंग शरीराच्या इतर रंगापेक्षा वेगळा असतो