दूधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते यामुळे डॉक्टर सर्व वयोगटाच्या लोकांना दूधाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
दुधातून कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी भरपूर असते.
दूधाचे सेवन केल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. दूध आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे.
प्रोटीनबाबत बोलायचे झाले तर गायीच्या एक कप दुधात 8 ग्रॅम प्रोटीन असतं.
बकरीच्या एक कप दुधात 8.7 ग्रॅम इतके प्रोटीन असतं.
म्हशीच्या दूधात देखील मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते.
सर्व प्राण्यांपैकी गाईचे दूध हे सर्वोत्तम मानले जाते.