दिवसाची पहिली सुरुवात आपण नाश्ताने करतो.
नाश्ता पौष्टिक आणि योग्य वेळेत केला नाही तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
त्याशिवाय आपल्या दिवसभराचा मूड त्यावर सेट होतो. त्यामुळे संशोधकांनी नाश्ता करण्याची योग्य वेळ सांगितलीय.
संशोधनानुसार योग्य वेळेत नाश्ता न केल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो.
त्यामुळे सकाळी 8 वाजण्यापूर्वी नाश्ता केल्याने हृदय निरोगी राहतं.
तर 9 किंवा 10 नंतर नाश्ता केल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)