पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळता, त्यामुळे पपईच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होता, असं तज्ज्ञ सांगतात.
आयुर्वेदाचार्य डॉ. एसके पांडे यांनी पपई दररोज खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात याबद्दल सांगितलंय.
ते म्हणतात दररोज पपई खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मूड चांगला होतो.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी मॅग्नेशियम, फायबर, फोलेट आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायच असेल तर दररोज सकाळी पपई खाल्ल्यास मदत मिळते.
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.
अँटी ऑक्सिडेंट, फायबर आणि पोटॅशियम असल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.
कर्करोगाच्या रुग्णांसाठी पपई खाणे फायदेशीर मानले जाते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)