जिरं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
जिऱ्याच्या अतिसेवनामुळे अनेकांना ॲलर्जीचा त्रास होतो.
जास्त जिरं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी खूप वाढू शकते.
जिरं हे अतिशय उष्ण असल्यामुळे गरोदरपणात जास्त प्रमाणात खाऊ नये.
जास्त जिरं खाल्ल्याने उलटीची समस्या देखील होऊ शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात जिऱ्याचा जास्त समावेश करू नये.
जास्त प्रमाणात जिरं खाल्ल्याने छातीत जळजळ आणि ढेकर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)