जेवणानंतर आवर्जून खा बडीशेप, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे

तेजश्री गायकवाड
Nov 02,2024


जेवण झाल्यावर बडीशेप खाल्ली जाते. या बडीशेपमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात.

त्वचा उजळ करते

बडीशेप त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. बडीशेपच्या पाण्याची वाफ घेतल्याने चेहऱ्याच्या त्वचेचा पोत राखण्यास मदत होते.

केसांच्या आरोग्यासाठी उत्तम

बडीशेपमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म कोंडा, डोक्याला खाज येणे आणि केस गळणे यासारख्या समस्यांवर बडीशेप एक प्रभावी उपाय आहे.

पचन सुधारते

पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेपचा खूप फायदा होतो. बडीशेप पोट फुगणे आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध करतात.

चांगल्या झोपेसाठी फायदेशीर

झोप चांगली येत नसेल तर बडीशेपचे सेवन करावे. एका बडीशेपमध्ये असलेले मॅग्नेशियम झोप सुधारण्यासाठी आणि झोपेची वेळ वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story