गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने म्हणजे हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पण हृदयविकाराचा झटका येण्याआधीच अनेक लक्षणे दिसतात. ज्यामुळे आपण परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणू शकता.
छातीत अस्वस्थता किंवा श्वासोच्छवास तीव्र झाल्यास तातडीनं डॉक्टरांची भेट घेणे गरजेचे असते, हे हृदयविकारच्या झटका येण्यापूर्वीचे पहिलं लक्षण असते.
जबड्यात होणाऱ्या दुखण्यामुळे हार्ट अटॅकची लक्षणे ओळखता येतात.
मान दुखणे हे हार्ट अटॅकचे सर्वप्रथम लक्षण आहे.
ह्रदयाच्या जवळ असल्यामुळे खांदेदुखी देखील हार्ट अटॅकचे लक्षण आहे.
जर तुमची पाठ सतत दुखत असेल तर हे देखील हार्टअटॅकचे लक्षण मानले जाते. अनेक लोक याला चुकीच्या पद्धतीने बसणे व झोपण्याचे परिणाम समजतात.
त्यामुळे छातीत दुखण्यासोबतच जर तुम्हाला ही लक्षणे दिसत असेल, तर तुम्ही नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)