अवघ्या काही दिवसांतच बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव म्हटलं की आपसूकच डोळ्यासमोर मोदक येतात. बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. उकडीचे मोदक हे सर्वांच्याच आवडीचे खाद्य आहे.
बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवत असताना कधी कधी घाईगडबड होते. कधी पीठ चिकट होते कधी सारण बाहेर येते. अशावेळी काय करावे, याच्या सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मोदक करत असताना तांदळाची उकड व्यवस्थित जमली तर मोदकही छान होतात. कधी कधी उकड फसली तर मोदक चिकट होण्याचीही शक्यता असते. अशावेळी ही एक वस्तू वापरल्यास उकड छान येईल.
सर्वात आधी मोदकाचे सारण तयार करुन ठेवा. ओला नारळ आणि गुळ वापरुन सारण तयार करा. त्यानंतर उकड काढण्यास सुरुवात करावी
तांदळाची उकडीसाठी आंबेमोहर, इंद्रायणी किंवा नवीन तांदूळ वापरावा त्याला चिकटपणा चांगला असतो व पिठाची उकड छान येते.
उकड काढताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरल्यास मोदक पांढरे शुभ्र व मऊ होतात. त्याचबरोबर आणखी एक सिक्रेट वस्तू वापरल्यास सारण बाहेर येणार नाही.
उकड काढत असताना सर्वात पहिले तूप टाकावे. त्यानंतर भांड्यात गरजेइतकी पाणी टाकून उकळवून घ्यावे. मगच तांदळाचे पीठ टाकून हलक्या हाताने ढवळून घ्यावे.
मात्र, तूप टाकत असताना प्रमाणात टाकावे उदा एक वाटी पीठाला अर्धा चमचा तूप घालावे. तुप घातल्याने मोदकांना छान लकाकी येते आणि मोदक वळताना पिठी हाताला चिकटतही नाही
मोदक वाफवायला ठेवताना थोडे मोकळे ठेवावे एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसंच, जर मोदक कोरडे झाले असतील तर ते पाण्यात बुडवून मग वाफ घ्या म्हणजे मोदक फुटणार नाहीत.