जेवणात चरबीयुक्त पदार्थ खाणे, स्ट्रेस, व्यायामाचा अभाव, मद्यपान, आजची जीवनशैली, यामुळं कोलेस्ट्रॉल वाढते.
शरीरातील कोलेस्ट्रॉलचा पातळी 200 मिलीग्रामपर्यंत प्रति डेसीलिटरने वाढली तर ते धोकादायक ठरू शकते.
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर खास पायांमध्ये काही लक्षणं दिसून येतात, ती कोणती ते पाहूयात.
क्लॉडिकेशनमध्ये रक्त प्रवाह कमी झाल्यामुळं वेदना होतात. हे हाय कोलेस्ट्रॉलचे एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे.
पाय थंड पडणे हे हाय कोलेस्ट्रॉलचे आणखी एक लक्षणं मानलं जातं.
तुमच्या पायाच्या त्वचेचा रंग बदलला असेल किंवा तुम्हाला काही बदल जाणवत असेल तर हे देखील हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षण मानलं जातं.