उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या दिवसात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते.
अशा परिस्थितीत आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
शरीर मजबूत करण्यासाठी आणि उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी आहारात काही भाज्यांचा समावेश केलाच पाहिजे.
प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासोबतच या भाज्यांमध्ये प्रथिनेही मुबलक प्रमाणात असतात.
ब्रोकोलीमध्ये अँटिऑक्सिडंट्ससोबत व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला याचा खूप फायदा होतो.
पावसाळ्याच्या दिवसात पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि अमीनो ऍसिड असतात.
हिरवे वाटाणे खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
हिरव्या वाटाण्यामध्ये मॅग्नेशियम, लोह आणि झिंक असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)