दुधात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. ज्याचा फायदा शरीराला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आयुष्यभर हाडे मजबूत ठेवते. शरीराला ऊर्जा देण्यासोबतच आजारांपासूनही संरक्षण करते.
मात्र अनेक लोकांना नियमीत दूध पिऊन देखील फायदे मिळत नाहीत. याचे कारण असू शकते चुकीच्या वेळी दूध पिणे.
रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. त्यामुळे शरीर दुधातून जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून घेते. मात्र, दिवसभरातही दूध प्यायल्यास काहीही नुकसान होत नाही.
रिकाम्या पोटी दूध पिणे टाळावे. कारण रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅस होऊ शकतो.
लहान मुले कधीही दूध पिऊ शकतात. यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते आणि त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होतो.
दिवसाऐवजी रात्री दूध पिणे अधिक फायदेशीर आहे. अशा स्थितीत रात्री नियमित दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
दूध प्यायल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. दूध कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, जे दातांच्या समस्या टाळतो.