एवढा वेळ उभं राहून वजन करा कमी, इथे जाणून घ्या सोप्या टिप्स
Jan 18,2024
वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन घाम गाळला पाहीजे किंवा डायट प्लॅनच फॉलो केला पाहिजे असं अजिबात नाही.
अनेक योगासने आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचं वजन कमी करु शकता.
जर तुम्ही जास्त वेळ बसून असाल तर उभं राहुन 3 ते 5 मिनिटं शरिराला स्ट्रेच करावं.
जास्त वेळ उभे असाल तर तुमच्या शरिरातील कॅलरी बर्न होतात. यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते.
जर तुम्ही बसून असाल तर उभं राहण्याच्या तुलनेत तुम्ही कमी कॅलरीज बर्न करु शकता.
उभं राहील्यानं पोट आणि मांड्यावरचं फॅट कमी होतं.
पण जास्त वेळ उभं राहिल्यानं शरिरातील उर्जा कमी होऊन पायाला सुज येउ शकते.
चला तर मग पाहुया यासाठी किती वेळ उभं रहावं, ज्यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं.
तुम्ही बसण्याऐवजी दररोज सहा तास उभं राहिल्याणं, तुम्ही सुमारे 54 अतिरिक्त कॅलरीज बर्न करु शकता.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)