आजच्या काळात मधुमेह हा एक मोठा आणि गंभीर आजार बनला आहे.विशेषत: भारतात मधुमेहाचे रूग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते मधुमेह वाढण्याची मुख्य कारणे खराब जीवनशैली,असंतुलित आहार आणि कामाच्या ठिकाणी सतत बसणेदेखील धोकादायक ठरू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कामाच्या ठिकाणी सतत बसून केवळ मधुमेहच नाही तर हृदयविकाराचा झटका,हाय बीपी,लठ्ठपणा यांसारखे आजारसुद्धा उद्भवू शकतात.
जर तुम्हालासुद्धा या आजारांपासून लांब रहायचे असेल तर या टिप्स कामाच्या ठिकाणा वापरा.
ऑफिसमध्ये लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्याचा वापर करा.कारण वर खाली केल्याने वजन कमी होते आणि रक्ताभिसरणही सुधारते.
जास्त वेळ बसल्याने वजन वाढते. यामुळे मधुमेहाचा त्राय होऊ शकतो. थोडा वेळ कामाच्या दरम्यान चालण्यासाठी वेळ काढा.
जर तुम्हाला या आजारांपासून वाचायचे असेल तर ऑफिसमध्ये जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नका. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते.
आहारात पोषक तत्वांचा समावेश करा.ऑफिसमध्ये जास्त स्नॅक्स खाणे टाळा.यामुळे रक्तातील सखरेची पातळी वाढते आणि ही परिस्थिती मधुमेहाच्या रूग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)