कणीस खाणं आरोग्यासाठी धोकादायक

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना कणीस खायला आवडतं. कणीस पोषक असल्याचं सांगण्यात आलं आहे, त्यामुळे लहान मुलांना ते सहजपणे खायला दिलं जातं. पण त्याचे काही दुष्पपरिणामही आहेत.

प्रमाणापेक्षा जास्त कणीस खाणं धोकादायक

पावसात मक्याला खूप मागणी असते. पण प्रमाणापेक्षा जास्त कणीस खाणं शरिराला धोकादायक असतं.

पेलाग्रा

पेलाग्रा एक प्रकारचा आजार आहे. जो विटॅमिन बी 3 कमी असल्याने होते.

शरिरात मिनरल्स आणि विटॅमिन कमी

कणीस खाल्ल्याने पोट लवकर भरतं. त्यामुले तुम्ही ते जास्त खाल्ल्यास शरिरात मिनरल्स आणि विटॅमिन कमी होऊ शकतात. ज्यामुळे पेलाग्रा होण्याचा धोका असते.

रक्तातील साखर वाढण्याचा धोका

कणीसमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असतं. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे तुम्हाला डायबेटिज असेल तर हे खाणं टाळा

गॅस आणि पोट फुगणे

कणीसमध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते जास्त खाल्ल्यास पोटात गॅस होतो. तसंच ब्लोटिंग म्हणजे पोट फुगतं.

पचनात बाधा

तुम्ही एकाहून अधिक कणीस खाल्ल्यास पचनप्रक्रिया खराब होते. कणसात फायबर असतं आणि ते जास्त खाल्ल्यास पचनक्रिया इतकं फायबर पचवू शकत नाही. त्यामुळे गॅल, ब्लोटिंग, अपचन अशा समस्या जाणवतात.

बद्धकोष्ठता

कणीसमध्ये इतर न्यूट्रिशनच्या तुलनेत फायबर अधिक असतं. त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

दातदुखी

कणीस गोड असतं. त्यावर प्रक्रिया केल्यास गोडवा वाढतो. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर दात व्यवस्थित स्वच्छ करा.

त्वचेवर पुरळ आणि खाज

कणीस खाल्ल्याने काही लोकांना त्वचेवर पुरळ आणि खाज या समस्या जाणवू शकता. डोकेदुखीही जाणवू शकते.

VIEW ALL

Read Next Story