चपाती खालल्याने आरोग्यावर कोणता दुष्परिणाम होतो?

वजन वाढणे

शरीरातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढल्यास शरीरातील फॅट्स वाढतात. फॅट्स वाढल्याने तुमचे वजनही वाढायला सुरुवात होते.

अपचन होणे

जास्त प्रमाणात चपाती खाल्ल्याने आपली पचन शक्ती बिघडू शकते. ज्यांची पचनशक्ती चांगली नाही त्यांनी जास्त प्रमाणात चपात्यांचे सेवन करू नये.

ब्लड शुगर लेवल वाढणे

गव्हाच्या पिठात कार्बोहायड्रेट असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.

असमतोल पौष्टिक आहार

चपातीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम आणि प्रोटीन असते, त्यामुळे तुमचा आहार पौष्टिक मात्र असमतोल असू शकतो.

ग्लूटेनचे प्रमाण

काही लोकांना ग्लूटेन ऍलर्जीची समस्या असते. त्यांच्यासाठी अधिक प्रमाणात चपाती खाणं घातक ठरू शकतं.

पोटदुखीची शक्यता

काही लोकांना पोटाचे विकार असतात. त्यांच्यासाठी चपाती घातक ठरू शकते. चपातीमुळे अनेकांना पोटदुखी झाल्याचं दिसून आलंय.

VIEW ALL

Read Next Story