ऑफिसमधील तणाव, धावपळ आणि आयुष्यातील काही अचडणी यामुळे अनेकांना कितीही थकलो असो तरी शांत झोप लागत नाही. सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी चांगल्या आणि शांत झोपेसाठी उपाय सांगितले आहेत.
झोपण्यापूर्वी साधारण 2-3 तास आधी तुम्ही रात्रीचे जेवण करावं. जेवल्यानंतर त्वरीत झोपल्याने पचनसंबंधित त्रास उद्भवतात आणि शांत झोप लागत नाही.
शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी रात्री कोमट पाण्याने आंघोळ करा. त्यामुळे तुमचं शरीर चांगले रिलॅक्स होण्यास मदत होते. मात्र जास्त गरम पाणी वापरु नका.
बेडरुममधील वातावरण चांगलं असावं. त्यासोबत ऑर्गेनिक लँप लावल्यामुळे तुम्हाला फायदा होतो. सुंगधी वातावरणामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि डोक्यातील विचाराला ब्रेक लागतो.
शांत झोपेसाठी बेडवर गेल्यानंतर अंग स्ट्रेच व्हावं आणि रिलॅक्स व्हावं यासाठी बैठा योगा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 15 मिनिटं योगा केल्यामुळे तुमचं मन शांत आणि शरीर हलकं करेल.
आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सकारात्मक आणि स्वतःबाबत विचार करा. यामुळे तुम्हाला फायदा होईल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)