रात्रीचे जेवण हे परिपूर्ण असावे, असं मानलं जातं. कारण चांगली झोप, ब्लड शुगर आणि पचनसंस्थेसाठी जेवण हलकं फुलकं घ्यावे असा सल्ला दिला जातो.
दिवसभराच्या धावपळीमुळं शरीर थकते त्यामुळं रात्री हेल्दी जेवण जेवल्यास शरीरात उर्जा निर्माण करते.
भारतातील काही लोक डिनरमध्ये भात किंवा रोटी खाणं पसंद करतात. अशावेळी डिनरमध्ये भात खावा की चपाती खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, अशा सवाल उपस्थित होतो.
भात आणि चपातीमधील पोषक तत्वांमध्ये जास्त अंतर नसते. भातात सोडियमची मात्रा अगदीच कमी असते. तर, 120 ग्रॅम गव्हात 190 मिलीग्रॅम सोडियम असते
भातात कॅलरी जास्त प्रमाणात असते तर पोषकतत्व त्या तुलनेने कमी असतात. 60 ग्रॅम भातात 80 कॅलरी, 1 ग्रॅम प्रोटीन, 0.1 ग्रॅम फॅट आणि 18 ग्रॅम कार्ब्स असतात.
गव्हाच्या चपात्यात तुलनेने जास्त पोषक तत्वे असतात. चपातीत 71 कॅलरी, 3 ग्रॅम प्रोटीन, 0.4 ग्रॅम फॅट आणि 15 ग्रॅम कार्ब्स असतात.
भातात चपातीपेक्षा फॉस्फोरस आणि मॅग्नीशियमची मात्रा कमी असते. भात आणि चपातीमध्ये समान मात्रेत फॉलेट आणि आयर्न असते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, भात आणि चपाती दोघही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भातासोबत डाळ खाल्ल्यास शरीराला पोषण मिळते. शरीराला आवश्यक असलेल्या अॅमिनी अॅसिडदेखील मिळतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)