दीर्घायुष्याचं रहस्य अखेर उलगडलं; फक्त 'ही' एक शिस्त वाढवेल तुमचं आयुष्य

Nov 24,2023

आपण दीर्घायुष्य जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यासाठी काही शिस्त पाळणं गरजेचं असतं.

इटलीमधील अब्रुझो भागात केलेल्या संशोधनात एक महत्वाची बाब समोर आली आहे.

'फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन जर्नल'मध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे. त्यानुसार रात्रीच्या जेवणाची वेळ आणि आयुर्मान यांचा संबंध आहे.

संशोधनात 90 ते 99 वयोगटातील वृद्धांचा समावेश करण्यात आला होता.

दीर्घायुषी ठरलेले अनेकजण रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 ते 7.15 पर्यंत करतात. तसंच दुसऱ्या दिवशी दुपारी जेवतात.

म्हणजे त्यांच्या दोन वेळच्या जेवणात 17.5 तासाचं अंतर असतं.

तसंच त्यांच्या आहारात धान्य, फळं, भाजा यांचा समावेश असतो.

मांस, अंडी, मिठाई आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आहारात फार कमी प्रमाणात ते घेतात.

VIEW ALL

Read Next Story