रक्षाबंधन स्पेशलः गुळाचा नारळी भात कसा बनवाल?; पाहा सोपी रेसिपी

नारळीपौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यादिवशी पारंपारिक नारळी भात बनवण्याची प्रथा आहे.

नारळी भात बनवताना त्यात साखर वापरली जाते मात्र, साखर न वापरताही तुम्ही चमचमीत व पौष्टिक भात बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला गुळ घालून नारळी भाताची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य - तांदूळ, गूळ, नारळाचा चव, तूप, वेलची पूड, काजू, बदाम

कृती - भात करण्यापूर्वी तांदुळ अर्धा तास धुवून भिजत ठेवा. त्यानंतर एका भांड्यात दोन चमचे साजूक तूप घालून काजू- बदाम परतून घ्या.

काजू-बदाम परतून घेतल्यानंतर ते एका भांड्यात काढून ठेवा. त्यानंतर आता त्याच भांड्यात तांदूळ टाकून पाणी घालून मोकळा भात करुन घ्या.

एकीकडे भात शिजवायला ठेवला असतानाच दुसऱ्या भांड्यात नारळाचा चव आणि बारीक गुळ एकत्र शिजवून घ्या. हे मिश्रण छान एकजीव होऊन द्या.

मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्या शिजवलेला भात घालून त्यात वेलची पूड घाला. व पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्या.

त्यानंतर गॅसवर तवा ठेवा आणि त्यावर भाताचे पातेले ठेवून चांगली वाफ काढून घ्या.

VIEW ALL

Read Next Story