'या' लोकांनी अजिबात खाऊ नये पेर

अनेक लोकांना नाशपती म्हणजे पेर हे फळ खायला आवडते. यामध्ये असलेले पोषकतत्व आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण या फळामुळे काही लोकांना त्रास देखील होऊ शकतो. एक्सपर्टकडून जाणून घेऊया यामुळे होणारे नुकसान.

तज्ज्ञांचं मत

पेरमध्ये अनेक पोषकतत्व असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत. ज्यामुळे अनेक लाभ होतात. पण याचे सर्वाधिक सेवन देखील शरीरासाठी घातक आहे.

सर्दी-खोकला

पेर किंवा नाशपती हे थंड असते.यामुळे सर्दी खोकला आणि तापाची समस्या जाणवू शकते. त्यामुळे नाशपती खाणे टाळले पाहिजे.

ऍलर्जी

अनेक लोकांना पेरमुळे ऍलर्जी होते. त्या लोकांनी चुकूनही हे फळ खाऊ नये. यामुळे शरीराला खाज येणे अथवा सूज येण्यासारखी समस्या जाणवते.

उच्च रक्तदाब

पेर हे फळ खाल्ल्याने शरीराला फायदा होतोच सोबतच रक्तदाब कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास असल्यास आहारात याचा समावेश करावा.

वजन कमी करताना अडचण

पेरमध्ये कमी कॅलरी असतात. पण याचं अधिक सेवन केल्याने वजन वाढते. ज्यामुळे लोकांना वजन कमी करण्यात अडचण निर्माण होते.

घसा दुखणे

नाशपती हे थंड फळ आहे. यामुळे घसा दुखणे, खवखव यासारखी समस्या जाणवते. त्यामुळे लोकांनी या फळाचे सेवन करणे टाळले पाहिजे.

पचनक्रिया बिघडते

पचनाचा त्रास असलेल्या लोकांनी पेर खाणे टाळा. कारण याचे अधिक सेवन केल्याने पोटात गारठा निर्माण होतो. तसेच ब्लोटिंग, बद्धकोष्ठता आणि गॅससारखी समस्या जाणवते.

VIEW ALL

Read Next Story