दर तासाला मानवी शरीरात जातायत 16. 2 मायक्रोप्लास्टिकचे कण

मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?

5 मिमी पेक्षा लहान असलेल्या प्लास्टिकच्या कणांना (धूळ) मायक्रोप्लास्टिक्स म्हणतात. ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. पण, ते आपल्या शरीरात जातात.

पृथ्वीवर लाखो टन मायक्रोप्लास्टिक

पृथ्वीवरील पाणी, हवा आणि मातीमध्ये लाखो टन मायक्रोप्लास्टिक्स आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अजूनही हवेत झपाट्याने वाढत आहे.

मायक्रोप्लास्टिक्समुळे श्वसनाच्या गंभीर समस्या

2022 मध्ये, हे मायक्रोप्लास्टिक प्रथमच मानवी अंतर्गत श्वसन प्रणालीमध्ये आढळले होते. यामुळे मानवांमध्ये श्वसनाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत, असे अहवलामध्ये स्पष्ट झाले आहे.

7 दिवसांत पोटात जमा होतंय 5 ग्रॅम प्लास्टिक

दर आठवड्याला सरासरी 5 ग्रॅम प्लास्टिक मानवी शरीरात पोहोचत आहे. क्रेडिट कार्डचे वजन समान असते. अनेकांच्या शरीरात यापेक्षाही जास्त प्लास्टिक मिळत आहे.

विविध रसायनांनी तयार होतंय प्लास्टिक

संपूर्ण जगात कोणत्याही निर्बंधाशिवाय सुमारे 10,000 प्रकारची रसायने प्लास्टिकमध्ये मिसळली जात आहेत.

शरीरात कसं पोहोचतं प्लास्टिक?

मानवी शरीरात मायक्रोप्लास्टिक पोहोचवण्याचे मुख्य साधन सागरी मासे बनले आहेत. 2050 पर्यंत समुद्रात पोहोणाऱ्या माशांमध्ये प्लास्टिकचे वजन जास्त असणार आहे, असे अभ्यासात म्हटलं आहे.

जगाच्या निम्म्याहून अधिक लोकांमध्ये प्लास्टिक

मलेशियातील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सचे संशोधक ली योंग ये यांनी दावा केला की, मायक्रोप्लास्टिक्स मानवी अवयवांच्या निम्म्याहून अधिक भागात पोहोचले आहेत.

एका वर्षात किती प्लास्टिक शरीरात जातं?

एका वर्षात, 11,845 ते 1,93,200 मायक्रोप्लास्टिकचे कण शरीरात जातात, त्यांचे वजन 7.7 ग्रॅम ते 287 ग्रॅम असते.

आईच्या दुधातही प्लास्टिक?

शास्त्रज्ञांनी मातेच्या दुधातही मायक्रोप्लास्टिकच्या असल्याचे म्हटलं आहे. नेदरलँडमधील शास्त्रज्ञांना 8 पैकी 7 नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story