आगीवर भाजलेले मक्याचे कणीस आणि त्यावर चोळलेला मसाला,लिंबू . पाहातच क्षणी तोंडाला पाणी सुटते.
मक्याचे कणीस खायला अनेकांना आवडते. मक्याचे कणीस खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत.
मक्याचे कणीस हे पोषक तत्त्वांनी भरलेले असते. यात मोठ्या प्रमाणात फायबर आणि लोह असते.
मका रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यासह डोळे आणि हृदयाला हेल्दी ठेवते.
पचन क्रिया कमकुवत असल्यास मक्याचे कणीस खाणे टाळावे.
वजन कमी करायचे असेल मक्याचे सेवन अत्यंत कमी प्रमाणात करावे.
विशिष्ट प्रकारची एलर्जी तसेच त्वचा विकार असणाऱ्यांनी मक्याचे सेवन करु नये.