Monsoon tips : पावसाळ्यात अशी घ्या काळजी...

साफ-सफाई ठेवा

तुमच्या घराच्या आजुबाजूला किंवा सोसायटीत देखील साफ-सफाई आहे ना याची काळजी घ्या. कचऱ्यामुळे देखील अनेक अॅलर्जी पसरू शकतात.

पाणी पीत रहा

आता पावसाळा सुरु झाला असला तरी देखील भरपूर पाणी प्या. कोमट पाणी पिल्यास पचन प्रक्रिया खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. जेवणाच्या एक तास आधी आणि एक तासनंतर पाणी प्या. थंड पाणी पिणे टाळा.

तापमानात होणाऱ्या बदलावर लक्ष ठेवा

सकाळी कधी उन तर कधी पाऊस असल्यानं त्याकडे लक्ष द्या. या सततच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे देखील तब्येत बिघडू शकते. बाहेरून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. उन्हातून आल्यानंतर लगेच अचानक एसीमध्ये जाऊ नका.

डायटवर लक्ष ठेवा

थंड पदार्थ खाणं टाळा उदा. आयस्क्रीम, कोल्ड ड्रिंक, आंबट, तळलेले आणि मसालेदार पदार्थ. या काळात हेल्दी डायट ठेवा. हिरव्या भाज्या, घरी बनवलेला सूप घ्या.

मुलांवर ठेवा लक्ष

लहाण मुलं या काळात लवकर आजारी पडतात. त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांना डायरिया होण्याची शक्यता असते. त्यांना बाहेरचं खायला देऊ नका. घरचं पोषक अन्न त्यांना खायला द्या.

ओल्या कपड्यांना करा प्रेस

ओले कपडे असतील तर त्यांना प्रेस केल्याशिवाय घालू नको.

झोप आहे महत्त्वाची

पावसाळ्यात तुम्हाला 7-8 तास झोप पूर्ण मिळणं महत्त्वाचं आहे. कारण झोप पूर्ण होत नसेल तर तुम्ही लवकर आजारांना सामोरे जाण्याची शक्यता असते.

वर्कआऊट करा

दररोज नाहीतर आठवड्यातून तीन दिवस तरी व्यायाम करा. कारण त्यानं तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

ओले कपडे असताना एसीत जाऊ नका

ओले कपडे असताना एसीत गेल्यास तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता वाढते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)(All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story