भारतीयांची सकाळ ही चहाशिवाय होत नाही. खरं तर भारतात असंख्य चहाप्रेमी आहेत.
दिवसभरात ही लोकं कधीही चहा प्यायला एका पायावर तयार असतात.
जर हा चहा आले टाकलेला असेल तर मग क्या बात है. पावसाळा असो किंवा हिवाळा आल्याचा चहा छान वाटतो.
आल्यामुळे चहाची चव तर छान होतेच त्यासोबत आरोग्याला फायदा होतो. पण तुम्हाला चहा बनवताना आले कधी टाकावे, माहिती आहे का?
चहा बनवताना सर्वप्रथम पाणी, दूध, साखर आणि त्यानंतर चहापत्ती घालावी. आता एक उकळी घ्या.
आता त्यात आले घाला. आले बारीक किसून घ्यातल्यास चहाची चव अधिक वाढते.