बरणीतील कॉफी कडक झालीये, गुठळ्या झाल्यात, ही ट्रिक वापरुन करा स्टोअर!

चहा पावडरसोबतच कॉफीदेखील अनेकांचा विक पॉइंट आहे. घरात हमखास कॉफीची बॉटल आढळते. मात्र, काही महिन्यांनी डब्यातील कॉफी कडक होत्या किंवा गुठळ्या होतात.

डब्यातील कॉफी कडक झाली किंवा गुठळ्या पडल्या की ती निघता निघत नाही. हवेच्या संपर्कात आल्याने बरणीतील कॉफीचे गठ्ठे तयार होतात. अशावेळी एक ट्रिक वापरुन तुम्ही कॉफी स्टोअर करु शकता.

बाजारातून कॉफी आणल्यानंतर ती शक्यता हवाबंद बाटलीतच ठेवा. कारण वातावरणातील आर्द्रतेमुळं कॉफी ओली होऊन त्यात गुठळ्या तयार होतात.

कॉफी स्टोअर करताना काचेच्या बाटलीत खाली एक टिश्यू पेपर ठेवा त्यानंतर त्यावर थोडीशी चहापावडर टाका व नंतर पुन्हा त्यावर टिश्यू पेपर ठेवा

त्यानंतर कॉफी पावडरच्या बरणीचे झाकण घट्ट लावून घ्या. यामुळं कॉफी कडक होणार नाही आणि गुठळ्याही पडणार नाहीत

अनेकजण कॉफी फ्रीजमध्ये ठेवून देण्याची चूक करतात मात्र, असं करणे चुकीचे आहे. कॉफी नेहमीच सामान्य तापमानावर स्टोअर करावी.

कॉफी किचनमध्ये किंवा डायनिंग टेबलवरदेखील ठेवू शकता. पण लक्षात घ्या की जिथे आद्रता किंवा पाणी आहे तिथे ठेवू नका

VIEW ALL

Read Next Story