चपाती कडक होतेय...; कणीक मळताना 'हा' एक पदार्थ वापरा

चपात्या हा आपल्या रोजचा जेवणाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, कितीही प्रयत्न करुन पाहिले तरी मऊसूत चपाती काही केल्या होत नाही.

चपाती मऊ करण्यासाठी कणिक योग्य पद्धतीने मळता आली पाहिजे. कणिक भिजवताना त्यात हा एक पदार्थ टाका. त्यानंतर तुमच्या पोळ्या मऊ आणि टम्म फुगतील.

कणीक मळताना पीठ आणि पाण्याचे प्रमाण अचूक असणे गरजेचे आहे. पीठ भिजवण्याआधी ती व्यवस्थित चाळून घ्या.

मऊ पोळ्या हव्या असतील तर कणीक मळताना त्यात थोटे कोमट पाणी घालून भिजवा. किमान पाच मिनिटे थांबून मगच पीठ मळायला सुरुवात करा.

कणीक मळल्यानंतर लगेचच मळायला घेऊ नका. भिजवलेल्या कणकेवर ओला कपडा घालून १५ मिनिटे ठेवून द्या.

कणीक भिजवताना त्यात अर्धा ते एक चमचा तेल व तूपही टाका त्यामुळं चपात्या मऊ होण्यास मदत होते.

चपाती मऊ हवी असेल तर कणीक मळत असताना थोडेसे दूध त्यात टाका. त्यामुळं चपाती छान फुलते आणि टिकूनदेखील राहते.

चपाती करायला घेताना पुन्हा एकदा कणीक 1 मिनिटे मळून घ्यावी त्यामुळं चपाती लाटायला सोप्पे जाते

VIEW ALL

Read Next Story