आता घरच्या घरी करा फक्कड बासुंदी चहा, असा बनवा मसाला

हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा चहाच्या टपरीवर एका खास पद्धतीने केलेला चहा मिळतो. अनेकदा प्रश्न पडतो की हा चहा कसा बनवला असेल. आज आम्ही तुम्हाला बासुंदी चहाची रेसिपी दाखवणार आहोत.

Mansi kshirsagar
Oct 09,2023


सर्वप्रथम एका भांड्यात तीन कप दूध 10 ते 15 मिनिटे उकळून घ्यावे. एकीकडे दूध उकळत असताना चहाचा मसाला करुन घ्या.


चहाचा मसाला करण्यासाठी वेलची 1 टीस्पून, जायफळ 1/4, सुंठ 2 टीस्पून आणि साखर 1/4 टीस्पून हे साहित्य घ्या.


चहाच्या मसाल्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.


आता दूध उकळत असतानाच त्यात चहा पावडर आणि तुम्हाला चहा जितका गोड हवा असेल तितकी साखर टाका व शेवटी तयार केलेला चहाचा मसाला टाका.


दूध साधारणपणे 2 कप होईपर्यंत आटवून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅस बंद करुन चहा कपात ओतून घ्या


घरात पाहुणे आल्यावर किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही बासुंदी चहा बनवू शकता.

VIEW ALL

Read Next Story