भेंडी ताजी असतील तरच भाजीला छाव चव येते. पण सुकलेली किंवा चिकट झालेली भेंडीची भाजी केल्यास त्याची चव येत नाही.
बाजारातून भेंडी घेऊन आल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवूनही सुकून जातात. अशावेळी ही एक टिप वापरून आठवडाभर तुम्ही भेंडी फ्रेश ठेवू शकता.
भेंडी फ्रिजमध्ये ठेवताना बहुंताश वेळा गृहिणी एक चूक करतात ती म्हणजे तशीच प्लास्टिकच्या पिशवीतील भेंडी फ्रीजमध्ये ठेवतात. त्यामुळं एकतर ती चिकट होतात किंवा सुकतात.
बाजारातून भेंडी आणल्यानंतर ती ओली असतानाच फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ओलाव्याच्या संपर्कात आल्यास ती खराब होतात.
भेंडी फ्रीजमध्ये स्टोअर करत असताना सर्वप्रथम धुवून घ्या त्यानंतर एक पातळ कपड्यात सर्व भेंडी घेऊन सुकवून घ्या.
भेंडी सुकवून झाल्यानंतर एका एअर टाइट कंटेनर घ्या आणि त्यात कपड्यात गुंडाळून ठेवलेली भेंडी जशीच्या तशी ठेवा.
आता हा डब्बा असाच फ्रीजमध्ये ठेवून द्या. अशाप्रकारे तुमची भेंडी आठवडाभर कडक आणि ताजी राहतील.