हळद आणि पीठ वापरून लख्ख चमकतील तांब्याची भांडी, ही ट्रिक वापराच

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे शरीरासाठी लाभदायक असते. अनेकजण हल्ली तांब्याच्या बॉटलमध्ये पाणी पितात.


मात्र, रोज रोज वापरुन तांब्याची भांडी काळी पडतात. जर रोज त्यांची स्वच्छता करावी लागते. बरेच दिवस साफ न केलेली तांब्याची भांडी साफ करणं कठिण होऊन जाते.


तुमच्याकडे असलेली तांब्याची भांडीदेखील काळी पडली असतील तर, या टिप्स वापरुन लख्ख चमकतील.

मीठ आणि लिंबू

एक लिंबू कापून तो मीठाच्या पाण्यात टाका त्यानंतर 10 मिनिटानंतर या पाण्याने तांब्याची भांडी साफ करा.


मीठ आणि व्हेनेगरचं मिश्रण बनवा आणि त्यात तांब्याची भांडी भिजवत ठेवा. 15 मिनिटांनंतर तांब्यांची भांडी साफ करायला घ्या. काळपटपणा लगेचच निघून जाईल


पीठ आणि हळदीचा वापर करुनही तुम्ही तांब्यांची भांडी लख्ख चमकवू शकता. यासाठी एका भांड्यात हळद, बेसन किंवा कणकेचे पीठ टाका आणि त्यात थोडे व्हिनेगर टाकून तांब्यांच्या भांड्याला लावून घासून घ्या.


अशाप्रकारे तुम्ही या घरगुती उपायांनी तांब्याची भांडी लख्ख चमकवू शकता.

VIEW ALL

Read Next Story