कुरडईची झणझणीत भाजी; 15 मिनिटांत बनवा पारंपारिक आणि पौष्टिक रेसिपी

घरात भाजी शिल्लक नसताना आयत्यावेळी काय करायचं असा प्रश्न पडतो. आम्ही तुम्हाला एका झटपट बनणाऱ्या भाजीचा पर्याय देतोय.

मे महिन्यात कुरडई मोठ्या प्रमाणात केल्या जातात. त्याच वापरुन तुम्ही झटपट भाजी बनवू शकता. याची सोप्पी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

7-8 कुरडया, 1 कांदा, तेल, चवीनुसार मीठ, मसाला, कोथिंबीर, कडीपत्ता

कृत्ती

भाजी करायला घ्यायच्या आधी कुरडया पाण्यात भिजत ठेवा. फार वेळ पाण्यात राहणार नाही याची काळजी घ्यावी.

त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरुन घ्या त्यानंतर कढईत तेल गरम करुन कडिपत्ताची फोडणी द्या. फोडणी दिल्यानंतर कांदा परतून घ्या. कांदा चांगला कोंबवून झाल्यानंतर त्यात मसाला घाला.

त्यानंतर कुरड्यांमधील पाणी काढून कुरडया पातेलात टाकून सगळं नीट एकजीव करुन घ्याव्यात. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्यावेत

कुरडयाची भाजीला एक चांगली वाफ आल्यानंतर गॅस बंद करुन घ्यावा

VIEW ALL

Read Next Story