हॉटेलसारखं सांबर करा घरच्या घरी, अगदी 10 मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

इडली, मेदूवडा, डोसासोबत गरमा गरमा सांबर खूप खाणं अनेकजण पसंत करतात. साउथ इंडियन स्टाइल सांबार सगळ्यांनाच जमतो असा नाही. आज आपण घरच्या घरी सांबर कसा बनवायचा हे जाणून घ्या.

साहित्य

तुरीची डाळ- १ वाटी, चिंचेचा कोळ, दुधी भोपळ्याचे काप, टॉमेटो, कांदा, तेल, सांभार मसाला, कोथिंबीर, मीठ, साखर, राई, पाणी. फरसबी

कृती

साउथ इंडियन स्टाइल सांबर बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तुरीच्या डाळीत 2 कप पाणी आणि 2 टीस्पून मीठ टाकून कुकरमध्ये शिजवून घ्या. 2 शिट्ट्या घ्या.

त्यानंतर कढईत 2 चमचे तेल गरम करुन घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात सगळ्या भाज्या बारीक चिरुन परतवून घ्या.

भाज्या चांगल्या परतवून घेतल्यानंतर त्यात थोडीशी साखर, सांबर मसाला टाकून काही वेळ शिजवून घ्या. त्यानंतर त्यात चिंचेचा कोळ आणि शिजलेली डाळ टाकून एकजीव करुन घ्या. नंतर यात १ ग्लास पाणी मिक्स करा.

आता सांबरसाठी तडका बनवून घ्या. त्यासाठी फोडणीच्या भांड्यात एक चमचा तेल गरम करुन त्यात राई, लाल मिरची आणि कडिपत्ता टाकून तडतडू द्या.

राई तडतडल्यानंतर सांबरला फोडणी द्या आणि थोड्यावेळ अजून शिजवून घ्या. आता सजावटीसाठी त्यावर कोथिंबीर बारीक चिरुन टाका.

VIEW ALL

Read Next Story