लहान मुलं असो वा मोठ्या व्यक्ती प्रत्येकाला नूडल्स खायला आवडतात. नूडल्स चविष्ट असण्यासोबतच झटपट बनतात
त्यामुळे लोक झटपट नूडल्स बनवतात आणि भूक लागली खातात. मात्र इन्स्टंट नूडल्समध्ये जास्त सोडियम असतं
शिवाय त्यात सॅच्युरेटेड फॅट आणि कमी पोषण असते. त्यामुळे हे नूडल्स आरोग्यासाठी हानिकारक असतात.
इन्स्टंट नूडल्समध्ये कॅलरीजही खूप जास्त असतात. ज्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते.
सोडियममुळे इन्स्टंट नूडल्समध्ये उच्च रक्तदाब होऊ शकतो.
सोबतच हृदय आणि किडनीशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते.