पावसाळ्यात रोगराईचं साम्राज्य जास्त असतं त्यामुळे अनेकांना 'त्वचारोग' होतो.
पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाही, त्यामुळे अनेक जण 'इस्त्री' फिरवून कपडे वापरतात.
मात्र इस्त्री फिरवली तरी कपड्यांमधला ओलावा तसाच राहतो, त्यामुळे 'लाल पुरळ' आणि 'खाज येणं' सारखे त्वचारोग होतो.
पावसाळ्यात बाहेरुन घरी आल्यावर कपडे 'गरम पाण्यात' भिजत ठेवावेत. त्यामुळे कपड्यांवरच्या जंतूंचं संक्रमण होत नाही.
'कापूर' आणि 'निलगिरी' जंतूनाशक असल्याने त्वचारोगाची समस्या दूर होते.
बऱ्याच जणांना चिखलाच्या पाण्यामुळे पायांना 'जखमा' होतात आणि तळपायातून 'रक्त' येतं.
अशावेळी रात्री झोपताना पाय स्वच्छ करुन, त्यांना 'ग्लिसरीन' लावल्याने खूप चांगला फरक पडतो.
थंड हवामान असल्यामुळे शरीराला हवं तितकं पाणी प्यायलं जात नाही त्यामुळे त्वचा कोरडी पडते.
पावसाळ्यात सकाळी उठल्यावर गरम पाण्यात एक चमचा 'तूप' मिसळून प्यायल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)